Sunday, 17 April 2011

भारतीय संस्कृती नेमकी काय भानगड आहे ही ?

 || श्री ||
 
                                                                        हिंदू  कालगणना :   चैत्र-वैशाख २०६७-२०६८, चतुदर्शी
                                                                        ख्रिस्ती  कालगणना :  १७ एप्रिल २०११
 
                                                               
          भारतीय संस्कृती नेमकी काय भानगड आहे ही ? 
 
हल्ली आपल्याकडे भारतीय संस्कृती रक्षकांचे फार पेव फुटले आहे..जो येतो तो आपले संस्कृती रक्षणाच्या  उपदेशाचे डोस पाजत असतो. एखादा सिनेमा पाहीला की ,झाली आपली संस्कृती भ्रष्ट, अमेरिकन  सिनेमा पाहिला की झाली संस्कृती भ्रष्ट, इंग्रजी बोलले  की झाली संस्कृती भ्रष्ट, डिस्कोमध्ये गेले, थोडी दारू पिऊन मौज मजा केली, सिगारेट फुंकल्या तर... डोक्यावरचा ताण घालवण्यासाठी ..तरी झाले संस्कृतीचे कल्याण.. च्यायला आम्हाला दररोज किती डोक्याला त्रास असतो ..जगण्यासाठी लढावे लागते प्रत्येक क्षणाला..एवढ्या मानसिक अग्नी दिव्यातून जात असताना आम्ही थोडी मौज मजा केली तर ..या संस्कृती वाल्यांच्या बापाचे काय जाते.. यांच्या पोटात का दुखते? यांना काही काम नसतील तर..हिमालयात जाऊन एखाद्या बाबाकडे जाऊन योगा करत बसा म्हणावे...आमच्या डोक्याला त्रास का देतात ? माझे आयुष्य आहे..एकच आहे..ते मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना..तुमची नसती ढवळाढवळ नकोय आम्हाला आमच्या आयुष्यात...आपली भारतीय संस्कृती काय एवढी तकलादू आहे का हो ..आमच्या एवढ्याशा मुक्त वागण्याने तिला लगेच तडे जातात तर.. हे करू नका..ते करू नका..     
नाही झाले तेवढे खूप झाले.. आता आम्हाला बघायचेच आहे काय आहे भारतीय संस्कृती..तिचा शोध घेऊन या रिकामटेकड्या लोकांच्या फालतू प्रश्नांना सडेतोड उत्तर द्यायचे..
आम्हाला जर काही चांगले वाटले..आमच्या बुद्धीला पटले ..तर आम्ही आत्मसात करू ना ते..पण आमचा निर्णय आम्ही घेणार ..तुम्ही नाही थोपवायचे तुमचे विचार आमच्यावर...आम्हाला तुमची भूमिका योग्य वाटली तर तुम्हाला आम्ही नमस्कार करू दोन्ही हात जोडून...नाहीतर त्याच दोन हातांनी....हा समजले ना ?
चला तर.. आपण सगळे मिळून . या प्रश्नाला एकदाचा निकालात काढूयात..शेवटी प्रश्न आपल्या भविष्याचा आहे ..आपल्या स्वातंत्र्याचा आहे...आपल्या मिळालेल्या एकाच आयुष्याचा आहे...आपले आयुष्य आपण कसे जगायचे ..हे आम्हाला कुणी तरी अनाडी , गुंड माणसांनी येऊन सांगावे हे आम्हाला मान्य नाही म्हणजे नाहीच....  
 
चला तर मग, या भारतीय संस्कृतीच्या सफरीला... 
तुम्हाला पण पडलेत का असे काही प्रश्न, ज्यांचे उत्तर मिळत नाही आहे..
सहभागी व्हा, आमच्या युवा  अखंड भारत गूगल संघामध्ये
कळवा, आपल्या सूचना ,प्रतिक्रिया आमच्या लेखाच्या comments section मध्ये..
 
   
आपली संस्कृती, आपला ठेवा....
हमारी संस्कृती, हमारी विरासत
The Knowledge of Bharat
   

No comments:

Post a Comment